कुणकवण माजी सरपंच मनोहर सावंत यांचे दुःखद निधन 

 

आचरा :कुणकवण गावचे माजी सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस

राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांचे विश्वासू सहकारी मनोहर हरी सावंत वय 74वर्षे यांचे मंगळवार १६सप्टेंबर रोजी आकस्मिक निधन झाले.ते कुणकवण ता.देवगड गावचे १०वर्षे सरपंच होते.

गावच्या विकासासाठी झटणारे अशी त्यांची ओळख होती.

विनोदजी तावडे यांचे वडील स्व. श्रीधर (अण्णा) तावडे यांच्या सोबत त्यांनी भाजपा पक्षाचे काम सुरु केले होते.अतिशय मनमिळावू आणि सहकार्यास ते तत्पर असत.त्यांच्या

सरपंच पदाच्या कार्यकाळात गावातील सर्व वाड्यामधून सर्व वस्ती पर्यंत पक्के डांबराचे रस्ते तयार करण्यासाठी प्रयत्न केले.त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगी असा परीवार आहे.