सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील माठेवाडा येथील रहिवासी जुन्या पिढीतील ज्येष्ठ सुवर्णकार प्रकाश बाळकृष्ण चोणकर (८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. माठेवाडा नवरात्र उत्सव मंडळाचे ते संस्थापक सदस्य होते. गेली ३४ वर्षे या मंडळाच्या विविध सामाजिक तसेच धार्मिक उपक्रमांमध्ये ते हिरीरीने सहभागी होत असत. प.पू. राणे महाराजांचे ते निःसीम भक्त होते. त्यांच्या पत्नीचे चार महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. त्यांच्या निधनाने माठेवाडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहेत.
त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते तथा सुवर्णकार बाळ चोणकर तसेच मिलिंद चोणकर यांचे ते वडील होत.












