कणकवली : सेवा पंधरवडा २०२५ च्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी कणकवली शहर मंडळातर्फे जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार दि. २७ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ या वेळेत HPCL हॉल, कणकवली कॉलेज, कणकवली येथे होणार आहे.
स्पर्धेत दोन गट ठेवण्यात आले असून शालेय गटाचा विषय ‘पर्यावरणावर आधारित रांगोळी’ तर खुल्या गटाचा विषय ‘स्वच्छ भारत अभियान’ असा आहे. शालेय गटासाठी बक्षिसे पुढीलप्रमाणे आहेत – प्रथम ₹२००० व सन्मानचिन्ह, द्वितीय ₹१५०० व सन्मानचिन्ह, तृतीय ₹१००० व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ स्पर्धकाला ₹८०० व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. तर खुल्या गटासाठी बक्षिसे; प्रथम ₹३००० व सन्मानचिन्ह, द्वितीय ₹२५०० व सन्मानचिन्ह, तृतीय ₹२००० व सन्मानचिन्ह तसेच उत्तेजनार्थ ₹१००० व सन्मानचिन्ह याप्रमाणे बक्षिसे असून सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
रांगोळी स्वतः स्पर्धकाने आणायची असून रांगोळीची साईज शालेय गटासाठी ३०३ फूट आणि खुल्या गटासाठी ४४४ फूट ठेवण्यात आली आहे. रांगोळी धान्य, फुले अथवा इतर विविध माध्यमामध्ये चालू शकते. नोंदणीची अंतिम तारीख २५ सप्टेंबर, २०२५ आहे. अधिक माहितीसाठी आयोजकांशी संपर्क साधावा.
रविकिरण शिवलकर ८८८८९३४१००, प्रविण चिंदरकर ९५६१६९६६६८, अभय गावकर -९४२३८२०५४८, महेश मढवी ८८०५७५७९१९.













