Ratnagiri : हातखंबा येथे दोन घरफोड्या; २ लाख १५ हजारांचा मुद्देमाल लांबवला

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा-कदमवाडी व शेजारील तारवेवाडी येथील दोन बंद घरे फोडून अज्ञात चोरट्याने तब्बल २ लाख १५ हजारांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना बुधवार १७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४५ ते दुपारी ३.१५ या वेळेत घडली.

याबाबत संजय शिवराम कदम (४१, रा. हातखंबा कदमवाडी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, १७ सप्टेंबर रोजी ते कुटुंबासह काही कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेले होते. या कालावधीत अज्ञाताने त्यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या सिमेंटच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला व कपाटातील लॉकरमधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

यानंतर चोरट्याने शेजारील तारवेवाडी येथील रमेश रत्नू तारवे यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व लोखंडी कपाटाचे लॉकर फोडून त्यातील पैसे चोरून नेले.

या प्रकरणी ग्रामीण पोलिस अधिक तपास करत आहेत.