गाव पातळीवर समिती गठीत करतानाच पशुधन विभागाने गुरांचे १०० टक्के टॅगिंक करण्याचे प्रातिधिकाऱ्यांचे आदेश
आमदार किरण सामंत यांनी घेतली गांभीर्याने दखल
राजापूर | प्रतिनिधी राजापूर शहरासह महामार्ग परिसर व ग्रामीण भागातील रस्त्यांवरिल मोकाट गुरांच्या गंभीर समस्येबाबत प्रशासकिय पातळीवरून आता गांभीर्याने दखल घेत कार्यवाहीच्या व धोरण निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहोत. मोकाट गुरांची संमस्या दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत असून यासाठी आता ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करून गावस्तरावर सहाय्यभूत ठरणारी ग्रामस्तरीय समिती गठीत करतानाच पशुसंवर्धन विभागाने गुरांचे शंभर टक्के टॅगिंग करण्याच्या सूचना प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन यांनी दिल्या आहेत.
राजापुरातील या मोकाट गुरांच्या समस्येबाबत मोकाट योग्य तो तोडगा काढून उपाययोजना व्हाव्यात अशी मागणी राजापुरातील सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार यांनी निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली होती. तर आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन याबाबत माहिती देण्यात आली होती. या एकूणच प्रश्नाबाबत आमदार किरण सामंत यांनी तातडीने दखल घेत प्रशासनाला यावर बैठक आयोजित करून तोडगा काढण्याबाबत सुचना केल्या होत्या. त्याची दखल घेत, आ. सामंत यांच्या सुचनेप्रमाणे सोमवारी राजापूर तहसीलदार कार्यालात प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या प्रमुख उपस्थितीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला तहसिलदार विकास गंबरे, पोलिस निरिक्षक अमित यादव, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, पशुधन विकास अधिकारी डॉ. वैभव चोपडे, नगर परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता अभियंता सुप्रिया पोतदार, आरोग्य निरीक्षक अमित पोवार आदी प्रशासकिय अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांनी याबाबत उपस्थितांशी चर्चा केली. राजापूर शहरासह महामार्ग, ग्रामीण मार्ग या भागातील मोकाट गुरांचा प्रश्न निश्चितच गंभीर आहे. मोकाट गुरांच्या मालकांवर आवश्यकतेप्रमाणे कायदेशीवर कारवाई करण्याबाबत निश्चितच धोरण ठरविले जाईत मात्र मोकाट गुरांची समस्या सोडविण्याची केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून सर्वांचीच आहे. त्यामुळे त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नागले, प्रकाश कुवळेकर, भाजपचे रविंद्र नागरेकर, अरविंद लांजेकर, फारूख साखरकर, मनोहर गुरव, दिवाकर आडविरकर, आजीम जैतापकर, मंदार ढेवळे यांनी चर्चेत सहभाग घेत मोकाट गुरांच्या समस्येवर योग्य तो तोडगा काढावा अशी मागणी केली.
यावेळी पोलिस निरीक्षक अमित यादव यांनी मोकाट गुरांच्या मालकांवर कशा पद्धतीने कायदेशीर कारवाई करता येईल याची माहिती दिली. तर, डॉ. चोपडे यांनी इअर टॅगिंगद्वारे गुरांच्या मालकांचा शोध कसा घेता येईल याची माहिती दिली. तर शहरात न. प. च्या वतीने मोकाट गुरांवर कारवाई सुरू करण्यात आल्याची माहिती श्रीमती पोतदार यांनी दिली.
यावेळी झालेल्या चर्चेअंती मोकाट गुरांच्या मालकांचा शोध घेणे, कायदेशीर कारवाईला सहकार्य करणे यासाठी विशेष ग्रामसभांचे आयोजन करून ग्रामस्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. गुरांचा मालक समजण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने शंभर टक्के इअर टॅगिंग करण्याचेही ठरविण्यात आले. या बैठकीला अॅड. महेश नकाशे, विनोद शेलार, प्रसाद मोहरकर, उमेश पराडकर, प्रसाद गुरव, प्रल्हाद नारकर यांच्यासह मोठ्यासंख्येने सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो 19 आरजेपी 4












