प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांचे संगणक परिक्षेत यश  

 

 

सावंतवाडी । प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास, व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळामार्फत फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेत प्रभावती कॉम्प्युटर एज्युकेशन संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. संस्थेच्या एकूण २४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

या परीक्षेच्या निकालामध्ये, सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर अकाउंटिंग अँड ऑफिस ऑटोमेशन या अभ्यासक्रमात कु. रुचिका विक्रम गवळी हिने ८७ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पहिले स्थान पटकावले. तिच्या पाठोपाठ कु. अमिषा सुनील गावडे (८४.७५ टक्के) आणि कु. श्रावणी शिवाजी भिसे (८०.२५ टक्के) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले.

सर्टिफिकेट कोर्स इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमात कु. जिलानी आगा ८३.५० टक्के गुण मिळवून जिल्हयात प्रथम आला. कु. वैष्णवी लक्ष्मण सावंत (८३.०० टक्के) आणि कु. प्रेरणा शाहीर चावरे (८१.७५ टक्के) यांनी जिल्हयात अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले.

तसेच, सर्टिफिकेट कोर्स इन डेस्क टॉप पब्लिशिंग (डी.टी.पी.) या अभ्यासक्रमात कु. प्राजक्ता प्रमोद डेगवेकर हिने ८७.७५ टक्के गुणांसह जिल्हयात पहिला क्रमांक पटकावला. कु. सना शाहू चोडणेकर (८७.२५ टक्के) आणि कु. चेतन मुकुंद डुगल (८४.७५ टक्के) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये अंकुश गुडेकर, पल्लवी मेस्त्री, चैताली कामत, गायत्री मेस्त्री आणि अदिती भांगले यांचाही समावेश आहे.

संस्थेचे प्राचार्य संदीप देवळी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे तेजस्वी गावडे आणि पल्लवी मेस्त्री यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले.

संस्थेमध्ये आयटी, डीटीपी आणि टॅली या अभ्यासक्रमांच्या नवीन बॅचेससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी वसंत प्लाझा, गांधी चौक, दुसरा मजला, सावंतवाडी येथील संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.