भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस विजयदुर्गमध्ये उत्साहात साजरा

जागतिक वारसा स्थळात सामील झालेल्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याची साफसफाई 

 

 

 विजयदुर्ग ( प्रतिनिधी ): भाजपच्या सेवा पंधरावडा दरम्यान प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त किल्ले विजयदुर्गच्या सर्व परिसरात पडेल मंडल भाजपातर्फे आज स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. २०० कार्यकर्ते आणि ४२ ग्रास कटर मशीनने आज जागतिक वारसा स्थळ असलेल्या किल्ले विजयदुर्ग परिसरात स्वच्छता मोहीम राबवुन पडेल मंडल भाजपाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यानी छत्रपती शिवरायांचा ऐतिहासिक वारसा जपला. पडेल मंडलाच्या वतीने भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आज विजयदुर्ग किल्ला परिसर स्वच्छ करण्याचे अभियान पार पडले. या स्वच्छता मोहिमेसाठी ४२ गवत कापण्याच्या मशीन व २०० कार्यकर्त्यांचा सहभाग होता. यामध्ये शलेय विधार्थी व महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

अभियानाचा शुभारंभ किल्ल्यावरील भवानी देवीला गाऱ्हाणे घालून करण्यात आला. यानंतर प्रत्येक जणांचा गट तयार करून किल्ला अंतर्गत परिसर स्वच्छ करण्यात आला. आज विजयदुर्ग किल्ला येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात भाजपा नेते बाळा खडपे, पडेल मंडल अध्यक्ष महेश ( बंड्या )नारकर, जिल्हा पदाधिकारी रवी पाळेकर, डॉ. अमोल तेली, अरिफ बगदादी, संजय बोंबडी, पडेल सरपंच भूषण पोकळे, रामकृष्ण जुवाटकर, भूषण बोडस,अंकुश टुकरूल, संजना आळवे, विजयदुर्ग सरपंच रियाज काजी, पडेल सरचिटणीस रवींद्र तिर्लॉटकर, रामकृष्ण राणे, प्रदीप साखरकर, दशरथ तळेकर बाबू चोडणेकर, विजयदुर्ग ग्रामपंचायत सदस्य शुभा कदम, पूर्वा लोबर, प्रतीक्षा मिठबावकर, सिद्धेश डोंगरे, जास्लीन फर्नांडिस, दिनेश जावकर तसेच स्थानिक नागरिक बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. या स्वच्छता मोहिमेत विजयदुर्ग एसटी आगार, गावातील सर्व सामाजिक मंडळं, विजयदुर्ग हायस्कूल, विजयदुर्ग प्राथमिक मराठी शाळा, उर्दू शाळा, सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या.