मुणगे समुद्र किनारी स्वच्छता अभियान!

मसुरे | झुंजार पेडणेकर आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिना निमित्त मुणगे ग्रामपंचायत तर्फे मुणगे आडवळवाडी समुद्र किनारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी गावातील प्राथमिक शाळा, श्री भगवती हायस्कूल, मुणगे ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान ट्रस्ट सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. सर्वांचे आभार सरपंच सौ. अंजली सावंत यांनी मानले.