सालपे शाळा नं. १ मध्ये शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

लांजा (प्रतिनिधी) भाजपा युवा मोर्चा तालुका संयोजक संकेत घाग यांच्या वतीने, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सालपे शाळा नं. १ मध्ये मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
लांजा तालुका भाजपाच्या वतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले. याच अनुषंगाने भाजपा युवा मोर्चा तालुका संयोजक संकेत घाग यांच्या वतीने शाळा सालपे नंबर १ येथील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप तसेच शैक्षणिक साहित्य वह्या, पेन यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाबद्दल शाळेचे शिक्षक तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांनी समाधान व्यक्त केले.