महिलाश्रम मधील वातावरण आनंददायी आणि नीटनेटके – मिंगेल मंतेरो

साईबाबा सोशल क्लब या वतीने महिलाश्रम मधील गरजू विद्यार्थांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

लांजा (प्रतिनिधी): गेली अनेक वर्षे महिलांसाठी काम करणाऱ्या महिलाश्रम लांजा या संस्थेतील वातावरण खरोखरच अल्हाददायक असून विद्यार्थ्यांमध्ये नीटनेटकेपणा आहे. भविष्यात आम्हाला लांजामध्ये मोठे सामाजिक काम करायचे आहे. असे सांगतानाच
संस्थेमधील जे गरजू विद्यार्थी, महिला आहेत त्यांच्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल अशी आश्वासन साईबाबा सोशल क्लब या संस्थेचे अध्यक्ष मिंगेल मंतेरो यांनी लांजा येथे केले.
साईबाबा सोशल क्लब या संस्थेच्या वतीने लांजा महिलाश्रमातील गरजू विद्यार्थांसाठी मोफत वह्या, छत्र्या,गणवेश आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप आज शुक्रवारी १९ जून रोजी सकाळी करण्यात आले. यावेळी मिंगेल मंतेरो बोलत होते. या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन जयवंत शेट्ये , लांजा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष संपदा वागधरे लांजा नगरपंचायतीचे गटनेते योगेश कावतकर, योगेश वागधरे ,साईबाबा सोशल क्लब चे अध्यक्ष मिंगेल मंतेरो, माजी मुख्याध्यापक विजय बेर्डे, माजी नगरसेवक दिलीप मुजावर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महिलाश्रम मधील गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश, छत्री आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष संपदा वाघधरे म्हणाल्या की, महिलाश्रम ही संस्था महिलांसाठी महिलांनी चालवलेली संस्था आहे. गोरगरीब अनाथ महिलांना आधार देण्याचे काम महिलाश्रम संस्था करते.साईबाबा सोशल क्लब ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक काम करत आहे. विविध समाज उपयोगी उपक्रम सातत्याने या संस्थेच्या मार्फत राबवले जातात. आज महिला आश्रम मधील मुलांना केल्या जाणारा मोफत शिक्षण साहित्य वाटप हा एक त्याचाच भाग असून आमच्या संस्थेत हा उपक्रम राबवत असल्याबद्दल त्यांनी साईबाबा सोशल क्लब पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.
यावेळी लांजा न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, माजी मुख्याध्यापक विजय बेर्डे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेतील मुलांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप केल्याबद्दल त्यांनी साईबाबा सोशल क्लबचे विशेष आभार मानले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत संतोष बेनकर यांनी केले. कार्यक्रमातील सूत्रसंचालन संदेश कांबळे यांनी केले. यावेळी संस्थेचे कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.