वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘नवोदय २०२५’ तांत्रिक महोत्सव

अडूर | वार्ताहर

गुहागर तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात दिनांक २५ व २६ सप्टेंबर २०२५ रोजी ‘नवोदय २०२५’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन तांत्रिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांचे आयोजन महाविद्यालयाच्या संगणक अभियांत्रिकी व स्थापत्य अभियांत्रिकी विभागांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले असून, संपूर्ण राज्यातून विविध अभियांत्रिकी व विज्ञान शाखांतील विद्यार्थी या महोत्सवात सहभाग घेणार आहेत.

 

या तांत्रिक महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या ज्ञान, कौशल्य व सर्जनशीलतेला वाव देणाऱ्या अनेक स्पर्धा ठेवण्यात आल्या आहेत. संगणक अभियांत्रिकी विभागात Hackathon, Code Quest, Google It, PC Assembly, Tech Hustle, तसेच BGMI व Free Fire यांसारख्या ई-स्पोर्ट्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. तर स्थापत्य अभियांत्रिकी विभागात Cube Testing, Bridge Making, Town Planning, Structural Photography व PPT Presentation यांसारख्या उपक्रमांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली असून, सहभागी विद्यार्थ्यांना उद्योगविश्वातील तज्ज्ञांशी संवाद साधण्याची व आपली कल्पकता सिद्ध करण्याची नामी संधी मिळणार आहे. अधिक माहितीसाठी स्पर्धा समन्वयक कु. शंतनू गुरव, भ्रमणध्वनी 8329036221,कु. अभिषेक पवार, भ्रमणध्वनी 7887781228 यांच्याशी संपर्क साधावा.