चिपळूण (वार्ताहर) : संगमेश्वर तालुका माध्यमिक हिंदी शिक्षक मंडळ, शिक्षण विभाग पंचायत समिती, डॉ. र .दि. गार्डी माध्यमिक विद्यालय कळंबस्ते ता. संगमेश्वर येथे राष्ट्रभाषा हिंदी पंधरवड्या निमित्त संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या देशभक्ती समूहगीत गायन स्पर्धा, विज्ञापन तथा जाहिरात प्रस्तुतीकरण, चित्र वर्णन, कथाकथन स्पर्धा घेण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे माजी अध्यक्ष, सल्लागार समिती अध्यक्ष अनिलकुमार जोशी, कानिटकर निबंधक, कृष्णा मालप माजी सरपंच, महामंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र खांबे, जिल्हाध्यक्ष मिलिंद कडवईकर होते. प्रारंभी दीप प्रज्वलन अनिलकुमार जोशी, अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. सरस्वतीच्या प्रतिमेस, संत कबीरदास, हिंदी कादंबरीचे सम्राट प्रेमचंद्र यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. डॉ. र.दी. गार्डी माध्यमिक विद्यालय कळंबस्ते संगमेश्वरच्या विद्यार्थिनींनी ओजस्वी आवाजात हिंदी मधून ईशस्तवन, स्वागतगीत सादर केले. प्रमुख अतिथी अनिलकुमार जोशी, कृष्णा मालप, कानिटकर, प्रशांत राऊत मुख्याध्यापक कोसबी, नलावडे मुख्याध्यापक साडवली, कांबळे मुख्याध्यापक देवरुख, राजेंद्र खांबे, मिलिंद कडवईकर, चावरे सर माध्यमिक स्कूल सेवक पतपेढी यांचा संगमेश्वर तालुका हिंदी शिक्षक संघटनेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
डॉ. र.दी गार्डी माध्यमिक विद्यालय कळंबस्ते हायस्कूलच्या वतीने विशेष सत्कार ज्येष्ठ शिक्षक अजित जाधव यांनी अनिलकुमार जोशी, राजेंद्र खांबे, मिलिंद कडवईकर यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन केला. अनिलकुमार जोशी यांनी भारताची राष्ट्रभाषा हिंदी आहे. महामंडळाच्या वतीने हिंदी, मराठी, इंग्रजी समान भाषा, समान गुण, समान तासिका केल्या. पाचवी हिंदी दोन वेळा बंद केले ते वाचविले. इ. पहिली ला हिंदी सुरू केल्याचे यश मिळाले. महाराष्ट्रात काही राजकीय पक्षांनी आंदोलन केले. त्यामुळे इयत्ता पहिलीचे हिंदी परिपत्रक मागे घेतले. त्रिभाषा सुत्रासाठी प्रयत्न सुरू आहेत. हिंदी बद्दल मानसिकता बदलली पाहिजे. हिंदी ही विश्व भाषा बनली आहे. सर्व भाषांचा सन्मान केला पाहिजे असे प्रतिपादन अनिल कुमार जोशी यांनी केले. प्रारंभी प्रास्ताविक दळी सर कळंबस्ते हायस्कूल मुख्याध्यापक यांनी केले. स्वागत सुहास गेल्ये संगमेश्वर तालुका हिंदी मंडळाचे अध्यक्ष यांनी केले.
देशभक्ती समूहगीत गायन स्पर्धा (प्राथमिक विभाग) प्रथम क्रमांक दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी, द्वितीय क्रमांक मीनाताई ठाकरे विद्यालय साडवली, तृतीय क्रमांक क.पा.मुळ्ये माध्यमिक विद्यालय कोळंबे, उत्तेजनार्थ न्यू इंग्लिश स्कूल देवरुख. माध्यमिक विभाग प्रथम क्रमांक मीनाताई ठाकरे विद्यालय साडवली, दुतीय क्रमांक न्यू इंग्लिश स्कूल देवरुख, तृतीय क्रमांक माध्यमिक विद्यालय कुंभारखाणी, उत्तेजनार्थ दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी. विज्ञापन जाहिरात प्रस्तुतीकरण स्पर्धा प्र प्रथम क्रमांक बुरंबी हायस्कूल, द्वितीय क्रमांक करजुवे हायस्कूल, तृतीय क्रमांक कोसुंब हायस्कूल, उत्तेजनार्थ पाध्ये हायस्कूल. कथाकथन स्पर्धा माध्यमिक प्रथम क्रमांक अनन्या कुलदीप डोळस बुरंबी हायस्कूल, द्वितीय क्रमांक वेदांती प्रदीप राव, तृतिय क्रमांक राखी सिताराम कोलास्ते माध्यमिक विद्यालय दाभोळे, उत्तेजणार्थ राकेश अनंत वरवटकर माध्यमिक विद्यालय करजूवे संगमेश्वर तालुक्यातील विविध हायस्कूल मधील १७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कडवईकर यांनी ओजस्वी हिंदी भाषेतून केले. आशिष सर मुकादम यांनी समारोप केला. हिंदी दिन सोहळा उत्साहात साजरा झाला.










