राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव तालुकास्तरीय स्पर्धेत मिलाग्रीस हायस्कूल प्रथम

इन्सुली हायस्कूल येथे संपन्न

बांदा l प्रतिनिधी :सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळ आणि विद्या विकास मंडळ इन्सुली यांच्या संयुक्त विद्यमाने नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली येथे राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव सावंतवाडी तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न झाली.

 

या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि.प. शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्या विकास मंडळ सचिव तथा माजी शिक्षण व आरोग्य सभापती गुरुनाथ पेडणेकर, तालुका गटशिक्षणाधिकारी सौ. एस. आर. परब, सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, विद्या विकास मंडळ उपाध्यक्ष महेंद्र सावंत, खजिनदार सदानंद कोलगावकर, सदस्य जयराम पालव, महेंद्र पालव, खरेदी-विक्री संघाचे संचालक आत्माराम गावडे, वाफोली उप सरपंच विनेश गवस, नेतर्डे ग्रा. पं. सदस्य कैलास गवस, नूतन माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सुविध्या केरकर, विस्तार अधिकारी कमलाकर ठाकूर, बीआरसी प्रतिनिधी सौ. स्नेहा गावडे, सौ. सातार्डेकर, संजय शेवाळे आदी उपस्थित होते.

 

यावेळी प्रमोद कामत म्हणाले, विज्ञानाचा नाट्यरूपातील उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे. अशा उपक्रमांतून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, वैज्ञानिक जागृती व अंधश्रद्धा निर्मूलन होईल. यावेळी गुरुनाथ पेडणेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

 

या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील ११ माध्यमिक शाळांनी सहभाग घेतला होता.

निकाल पुढीलप्रमाणे : प्रथम क्रमांक मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी, द्वितीय खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल बांदा, तृतीय मदर क्वीन हायस्कूल सावंतवाडी, उत्तेजनार्थ नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली, आरपीडी हायस्कूल सावंतवाडी. विशेष पारितोषिके : उत्कृष्ट नायक चिन्मय कोटणीस (कळसुलकर हायस्कूल सावंतवाडी), उत्कृष्ट नायिका स्नेहल मटकर (मदर क्वीन हायस्कूल सावंतवाडी), उत्कृष्ट नेपथ्य सुशांत गावडे (मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी), उत्कृष्ट दिग्दर्शक सुशांत जोशी (मिलाग्रिस हायस्कूल सावंतवाडी).

 

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सावंतवाडी तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश गावडे, सचिव संजय शेवाळे, सचिन पालकर, दिगंबर मोर्ये, संतोष वैज, सौ. तृप्ती दळवी यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक पांडुरंग काकतकर, सूत्रसंचालन नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुलीच्या विद्यार्थ्यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. प्रती सावंत यांनी केले.

——–