​’सम्यक साहित्य संसदेचा’ राज्यस्तरीय ‘उत्तम सर्वोत्तम साहित्य पुरस्कार’ कवयित्री स्नेहा कदम यांना जाहीर

​सावंतवाडी : सम्यक साहित्य संसदेचा या वर्षीचा ‘उत्तम सर्वोत्तम साहित्य पुरस्कार’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम यांना त्यांच्या “शिल्लक भीतीच्या गर्भकोषातून” या काव्यसंग्रहासाठी जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील आंबेडकरी साहित्य चळवळीत कार्यरत असलेली सम्यक साहित्य संसद, दिवंगत कवी उत्तम पवार यांच्या स्मरणार्थ दरवर्षी एका परिवर्तनवादी कवीच्या काव्यसंग्रहाची निवड करते.

​स्नेहा कदम यांच्या या काव्यसंग्रहाला यापूर्वी कवीवर्य पद्मश्री नारायण सुर्वे वाचनालयाचा विशेष काव्य पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा पद्मश्री नामदेव ढसाळ काव्य पुरस्कारही प्राप्त झाला आहे. त्यांच्या साहित्यिक वाटचालीला ज्येष्ठ नेते पॅंथर ज.वि. पवार, ज्येष्ठ लेखिका उर्मिला पवार, आशालाता कांबळे, डॉ. श्रीधर पवार, कवी सुनील हेतकर आणि प्रसंवाद परिवार यांचे सातत्याने मार्गदर्शन लाभले आहे.

​याच कार्यक्रमात, सम्यक साहित्य संसदेचा आ.सो. शेवरे स्मृती जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक आणि आंबेडकरी चळवळीतील खंबीर नेते विनायक मिठबावकर यांना घोषित करण्यात आला आहे.