उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे व दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची माहिती
चिपळूण (प्रतिनिधी):–पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानानिमित्ताने व तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपातर्फे विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. यामध्ये सेवा पंधरवडा अभियानांतर्गत संपूर्ण देशभरात नशामुक्ती भारत अभियानाचा प्रचार व प्रसार होण्याकरिता भाजपा रत्नागिरी जिल्ह्याच्यावतीने रविवार दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी चिपळूणात ‘नमो युवा रन मॅरॅथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते पुढे म्हणाले की, ही स्पर्धा दोन गटात होणार असून प्रथम गट हा वय वर्ष १४ ते १८ वर्ष असेल. तर दुसरा गट हा वय वर्ष १८ पासून पुढे खुला असेल. ही ‘नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धा’ रविवार दिनांक २८ रोजी सकाळी ६:३० वा. ते १०:३० वा. पर्यंत या वेळेत होणार आहे. या नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेचे अंतर ३ कि. मी. आणि ५ कि. मी अश्या दोन टप्प्यांमध्ये असणार आहे.
या स्पर्धेच्या प्रथम टप्प्याचा मार्ग इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिंचनाका बाजारपेठ बाजारपूल येथून पुन्हा त्याच मार्गे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे समाप्त होईल. तर दुसऱ्या टप्प्याचा मार्ग इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिंचनाका बाजारपेठ बाजारपूल -गोवळकोट कमानी येथून पुन्हा त्याच मार्गे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे समाप्त होईल.
‘नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धे’ मध्ये प्रथम तीन क्रमांक काढणाऱ्या स्पर्धकांना विजेते घोषित केले जाईल. प्रथम गट – प्रथम क्रमांक रोख रक्कम ५ हजार रुपेश., मेडल व आकर्षक सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक रोख रक्कम ४ हजार रुपये, मेडेल व आकर्षक सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक रोख रक्कम ३ हजार रुपये, मेडेल व आकर्षक सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक रोख रक्कम २ हजार रुपये व मेडल, पाचवा क्रमांक रोख रक्कम १ हजार रुपये व मेडल, सहावा क्रमांक रोख रक्कम ५०० रुपये व मेडल, सातवा क्रमांक ३०० रुपये व मेडल, आठवा क्रमांक २०० रुपये व मेडल देऊन सन्मानित केले जाईल.
तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल व आकर्षक टी शर्ट देऊन सन्मानित केले जाईल. ही स्पर्धा विद्यार्थी व विद्यार्थिनी अशा दोन स्वतंत्र गटात होणार आहे.
खुल्या गटात महिला व पुरुष अश्या दोन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम क्रमांक रोख रक्कम १० हजार रुपये, मेडल व आकर्षक सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक रोख रक्कम ७ हजार ५०० रुपये, मेडेल व आकर्षक सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक रोख रक्कम ५ हजार रुपये, मेडेल व आकर्षक सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक रोख रक्कम २ हजार ५०० रुपये व मेडल, पाचवा क्रमांक रोख रक्कम १ हजार रुपये व मेडल देऊन सन्मानित केले जाईल.
तरी या नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील/ महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस अमित केतकर, उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस वसंत ताम्हणकर, जिल्हा सरचिटणीस प्रणाली सावर्डेकर, उत्तर रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर, चिपळूण ग्रामीण पूर्व तालुकाध्यक्ष विनोद भूरण, चिपळूण शहराध्यक्ष शशिकांत मोदी, गुहागर तालुकाध्यक्ष अभय भाटकर, चिपळूण ग्रामीण पश्चिम अध्यक्ष उदय घाग, मंडणगड तालुका अध्यक्ष प्रवीण कदम, पंचायत राज जिल्हा संयोजक योगेश शिर्के, जिल्हा चिटणीस स्नेहा मेस्त्री, माजी नगरसेवक आशिष खातू , अनुसूचित जमाती मोर्चा अध्यक्ष संदिप भिसे, सहकार सेल जिल्हा संयोजक रत्नदीप देवळेकर, ओबीसी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वैशाली निमकर, जिल्हा पदाधिकारी संदिप सुखदरे, क्रिडा सेल जिल्हा संयोजक दत्ता नार्वेकर, महिला मोर्चा चिपळूण शहराध्यक्षा शीतल रानडे, सरचिटणीस सारिका भावे, युवा मोर्चा अध्यक्ष महेश तटकरे, अभिनव भूरण, मंदार कदम आदी उपस्थित होते.











