चिपळूण | प्रतिनिधी : श्रीराम एज्युकेशन सोसायटी संचलित परांजपे मोतीवाले हायस्कूलच्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती अर्चना एकनाथ सावर्डेकर ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्या. सेवेमध्ये प्रामाणिकपणा, विषयावर प्रभुत्व व वक्तशीरपणा, स्वयंशिस्त, विद्यार्थी, पालक व सहकारी शिक्षक या सर्वांमध्ये त्यांच्याबद्दल आदराची भावना होती. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा सौ. सई वरवाटकर यांनी स्वीकारलं होतं.
कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत, ईशस्तवनाने करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले. प्रशालेचे मुख्याध्यापक भाऊ कांबळे यांनी सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. स्वराली मुणगेकर, वेदिका हरवडे, गौरी चव्हाण या विद्यार्थिनींनी मॅडम बद्दलच्या भावना व्यक्त केल्या. श्रीराम एज्युकेशन सोसायटी,परांजपे मोतीवाले हायस्कूल, सौ.अपर्णा अशोक मेहंदळे प्राथमिक विद्यालय, शिशुविहार, संस्था पदाधिकारी, शिक्षक, माजी मुख्याध्यापक, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, आजी विद्यार्थी, सावर्डेकर कुटुंबीय व नातेवाईक या सर्वांकडून मॅडमचा विविध भेटवस्तू, पुष्पगुच्छ,शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींनी आपले पती एकनाथ सावर्डेकर यांच्या स्मरणार्थ श्रीराम एज्युकेशन सोसायटीला देणगी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.सई वरवाटकर मॅडम, शाळा समिती अध्यक्ष विनोद फणसे, शाळेचे मुख्याध्यापक भाऊ कांबळे, माजी विद्यार्थी शशिकांत मोदी, पुतणे संतोष सावर्डेकर, सुरेश सावर्डेकर, भाऊ काजरोळक, प्रशालेतील शिक्षिका सौ.मानसी टाकळे, सौ.स्वरा साडविलकर या सर्वांनी मॅडम विषयीच्या आठवणी व मनोगत व्यक्त केले. सौ.मानसी टाकळे यांनी मॅडमच्या सेवापुर्ती निमित्त लेख लिहून त्यांचा सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजी शिंदे यांनी तर विकास चांदे यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्ष सौ.सई वरवाटकर, शाळा समिती अध्यक्ष विनोद फणसे, कार्यवाह प्रशांत देवळेकर, कोषाध्यक्ष सिद्धेश लाड, कार्यकारी अधिकारी मल्लेश लकेश्री, सदस्य विजय बागवे व सुहास चव्हाण, मुख्याध्यापक भाऊ कांबळे, पर्यवेक्षक संभाजी मोटे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक, माजी विद्यार्थी, माजी मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक पतपेढीचे शाखाधिकारी व संचालक, सावर्डेकर कुटुंबप्रमुख विष्णुपंत सावर्डेकर सर्व सावर्डेकर कुटुंबीय, नातेवाईक, भाऊ,आई श्रीम.सुलोचना काजरोळकर, बहीण सौ.धामापूरकर, जावई राहुल देशमुख व अभिजीत मोरे ,मुली प्राजक्ता देशमुख, श्वेता मोरे, मुलगा रोहित सावर्डेकर, नातू, मैत्रिणी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.