नाटे पोलीसांची कारवाई: दोन दिवस पोलीस कोठडी
राजापूर | प्रतिनिधी : राजापूर तालुक्यात अमली पदार्थांची विक्री व अनैतिक व्यवसायांबाबत वृत्त प्रसिध्द होताच पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हा पोलीस अधिक्ष्त्रक डॉ. धनंजय कुलकर्णी यांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पोलीस यंत्रणा कामाला लागली असून सिंधुदुर्गातुन राजापूर तालुक्यात आलेल्या दोन इसमांना नाटे पोलीसांनी दोन किलो गांजासह अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राजापूर तालुक्यात कार्शिंगे परिसरात पोलीसांनी ही कारवाई केली आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे.
दिलीप भास्कर घाडी रा.तरला ता. कणकवली जि.सिंधुदूर्ग प्रविण आत्माराम गुरव रा. वारगाव ता. कणकवली जि. सिंधुदूर्ग अशी या दोन संशयीत आरोपींची नावे असल्याचे पोलीसांनी सांगितले.
नाटे पोलीसांनी केलेल्या या कारवाईमुळे आता हे अमली पदार्थ विक्रीचे रॅकेट कुठपर्यंत पोहचले आहे व यात कोण कोण सहभागी आहे हे लवकरच पुढे येणार आहे. पोलीसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असून पोलीसांनी याची पाळेमुळे खणून काढावीत अशी मागणी होत आहे.
रविवार दिनांक २ जुलै रोजी रात्री नाटे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दिलीप भास्कर घाडी रा.तरला ता. कणकवली जि.सिंधुदूर्ग प्रविण आत्माराम गुरव रा. वारगाव ता. कणकवली जि. सिंधुदूर्ग हे आपल्या ताब्यात गैरकायदा गांजा हा अंमलीपदार्थ बाळगल्या स्थितीत मिळून आले. त्यांची अंगझडती घेता त्यांचेकडे सुमारे रक्कम रुपये ४०,०००/- किमतीचा गांजा मिळून आला. याशिवाय आरोपींकडून गुन्हयात वापरलेली एक ४५०००/- रुपये कितीची यामा कंपनीची मोटार सायकल तसेच ५५००/- र किमतीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. असा सुमारे ९०,५००/- रुपये किमतीचा माल गुन्हयामध्ये जप्त केलेला आहे. अटक केलेल्या आरोंविरुध्द नाटे पोलीस ठाणे एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क).२० (ब) २ (ब) २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असल्याची माहिती नाटे पोलीसांनी दिली.
सदरहु गुन्हयाचे कामी वरील दोन्ही आरोपींनी अटक करण्यात आलेली असून आरोपींना दोन दिवस पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. आहे. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे अगर कसे ? याबाबत छडा लावणेसाठी अटक आरोपींकडे सखोल तमपास चालू असल्याचे नाटे पोलीसांनी सांगितले.
जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड, उपविभागिय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदारी, पोलीस काँस्टेबल सागर गुरव, सागरे कोरे,विवेक साळवी, दिगंबर ठोके, नरेश ठिक यांच्या पथकाने ही कारवाई केली. तर स्थानिक पातळीवर पोलीस पाटील राजू कार्शिंगकर, रवीकांत धामापूरकर यांसह ग्रामस्थांनी सहकार्य केल्याचे पोलीसांनी सांगितले.
राजापूर तालुक्यातील अमली पदार्थांची विक्री व अनैतिक व्यवसायाविरोधात वर्तमान पत्रात वृत्त प्रसिध्द झाले होते. त्यानंतर संपुर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. आता अशा प्रकारे गांजा विक्री करणारे दोन जण आढळून आल्याने आता याची पाळेमुळे पोलीसांनी शोधून काढावीत व याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
जिल्हयातील अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबऊन कडक कारवाई करणेबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुळकर्णी यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रमुख यांना निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व प्रभारी अधिकारी यांनी गोपनियरित्या गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढण्याचे काम सुरु केले. आहे.
जिल्हयातील अंमली पदार्थ विरोधी ठोस कारवाई करण्याची मोहिम जिल्हाभर राबविण्यात येत असून अंमली पदार्थाचा ताबा / विक्री विषयी काही गोपनिय माहिती नागरिकांना मिळाल्यास त्याबाबतची माहिती पोलीसांना कळविणेबाबत व यासंबंधीची माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवण्यात येणार असल्याबाबत जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुळकर्णी व अप्पर पोलीस अधिक्षक जयश्री गायकवाड यांनी आवाहन केले आहे.








