आज दि.२४ सप्टेंबर २०२५, राष्ट्रीय सेवा दिनानिमित्त एस. एस. पी. एम. इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये “अंमली पदार्थ विरोधी ” कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात 3.00 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सरस्वती देवीची पूजा व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.त्यानंतर प्रमुख पाहुणे व सर्व मान्यवर यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयातील इलेक्टिकल विभागप्रमुख डॉ.रावसाहेब ठोंबरे सर,
कॉम्पुटर सायन्स (ए. आय. एम. एल.) विभाग प्रमुख प्रा. प्राजक्ता राणे मॅडम उपस्थित होते.
कणकवली येथील एसएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालयात एनएसएस दिनानिमित्त अंमली पदार्थविरोधी जनजागृती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक श्री. रविंद्र पन्हाळे साहेब उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृतीविषयी मार्गदर्शन केले.तसेच एन. एस. एस. चे ब्रीदवाक्य “Not me but you” चा अर्थ समजावून सांगितला.
या कार्यक्रमात पोलीस कॉन्स्टेबल वेंगुर्लेकर साहेब यांनीही अंमली पदार्थांबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी परशुराम काळे याने व्यसनमुक्तीवर प्रभावी आणि उत्कृष्ट भाषण करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
हा कार्यक्रम संध्याकाळी 4.30 वाजता यशस्वीरित्या संपन्न झाला.
या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एस. बाडकर सर, सर्व विभाग प्रमुख ,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. व्ही. कुडतरकर डॉ.एस. टी.माने, श्री. वैभव यादव सर तसेच राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी समन्वयक कु.भार्गवी कवटकर , कु तुकाराम नाईक , कु. साईश कोचरेकर आणि कु.जिगीशा म्हापसेकर यांचे मोलाचे योगदान लाभले.













