देवगड येथे रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

रा. स्व. संघ स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सेवाभारती कोकण प्रांत ट्रस्ट आणि राष्ट्रीय संस्कार संवर्धन मंडळ, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

हे शिबीर रविवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत होणार असून, पडेल येथील श्री. लक्ष्मण साळवी यांच्या निवासस्थान (पडेल कॅन्टीन) आणि जामसंडे टिळक स्मारक, वडांबा-जामसंडे येथे रक्तदानाची सोय करण्यात आली आहे.

 

‘व्यक्तीनिर्माण से राष्ट्रनिर्माण’ या ध्येयाने कार्यरत असलेल्या रा. स्व. संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित या शिबिरात अधिकाधिक नागरिकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

नियमित रक्तदानामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण नियंत्रित राहते, हृदयविकाराचा धोका कमी होतो, हिमोग्लोबिनची पातळी सुधारते आणि एका रक्तदानातून तीन रुग्णांचे प्राण वाचवता येतात, असेही आयोजकांनी सांगितले.

 

संपर्कासाठी सुरेश देवळेकर (९८२३९१६९८२), लक्ष्मण साळवी (९४२३८३३११६) आणि जयेश खाडिलकर (७७७६९४५३३०) यांच्याशी संपर्क साधावा.