साटेलीतील युवकाचे गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन; क्रिकेटर प्रसाद परीट यांच्या निधनाने हळहळ

दोडामार्ग:प्रतिनिधी :साटेली भेडशी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कै. रमेश परीट यांचे सुपुत्र आणि तरुण क्रिकेटर कुमार प्रसाद परीट (वय 28)यांचे गोव्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. प्रसाद परीट हे गोव्यात एका खासगी फायनान्स कंपनीत कार्यरत होते. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूची बातमी समजताच साटेली-भेडशी परिसरात आणि दोडामार्ग तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. साटेली भेडशी परिसरातील उत्कृष्ट

क्रिकेटपटू म्हणून त्यांची परिसरात ओळख होती. आपल्या कामासाठी ते गोव्यात वास्तव्यास होते. कामावरून घरी आल्यावर रात्री जेवणा नंतर बाहेर फिरायला गेले असता अचानक छातीत दुखू लागले व त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्यांचे निधन झाले.

तरुण वयात झालेल्या या दुःखद निधनामुळे साटेली गावावर शोककळा पसरली असून, त्यांच्या निधनाने परीट कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. त्यांच्या पश्चात अविवाहित भाऊ, बहीण विवाहित असा परिवार आहे. साटेली गावातील व तालुक्यातील युवकांतर्फे त्यांच्या अकाली निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात येत आहे.