श्री साईबाबा पुण्यतिथी निमित्त कुडाळ कविलगाव साईदरबार येथे पुण्यतिथी उत्सवाचे आयोजन

कुडाळ:-श्री साईबाबा पुण्यतिथी निमित्त कुडाळ कविलगाव साई दरबार येथे पुण्यतिथी उत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त दिनांक 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त नवनाथ ग्रंथ पारायण दर दिवशी सकाळी 7 वा.अभिषेक व पूजा दररोज दु. 12:30 वाजता मध्यान आरती,दररोज रात्री नऊ वाजता सुश्राव्य भजन व आरती. दि.1 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:30 वा. हार्मोनियम सोलो वादन सादर करते. उत्कर्ष फोंडेकर गोवा,सायं 6.30 वा.अभंग वाणी सादर करते सुरज सहकारी, सावळो तोडणकर, सुनील दिवकर, प्रेमानंद आमोनकर, रात्री,8 वा महाआरती,रात्री 8.30 वा. महाप्रसाद, शास्त्रीय सुगम गायन कार्यक्रम गायक कमलाकांत गावस गोवा, साथसंगत- जाणू शिरवलकर, हार्मोनियम महेश गावस, रा.10 वा. डबलबारी भजनांचा आमने-सामने सामना बुवा वैभव सावंत विरुद्ध बुवा सुजित परब. दि. 2 ऑक्टोबर रोजी पहाटे 5.30वा.काकड आरती, सकाळी 6 वा.सुश्राव्य भजन महेश ओटवणेकर,गजानन पेडणेकर, सुरेश राऊळ,महेश कुडाळकर, दु. 12:30 वा. मध्यान आरती सायं. 5:30 वा. शास्त्रीय व सुगम गायन सादर करते विजयानंद म्युझिक क्लास कुडाळ गायक संगीत अलंकार प्रफुल्ल रेवंडकर,रा. 8.15 वा. महाआरती,रात्री 8.30वा. अभंग गायन सादरकर्ते निलेश शिंदे, तसेच दररोज 9 वा. सुश्राव्य भजनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.तरी भक्त भाविकांनी पुण्यतिथी उत्सवास उपस्थित राहून कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साई दरबार उत्सव समिती कुडाळ नेरूर कवीलगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.