कुडाळ : कुडाळ येथील एका मोठ्या आस्थापनेमध्ये काम करत असलेल्या फिर्यादी हिने तिथेच काम करत असलेला आरोपी यांचे विरुद्ध फिर्याद दिल्यावरून कुडाळ पोलीस ठाणे येथे दि. २ मे २०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. दि.१८ एप्रील २०२५ रोजीच्या रात्री कुडाळ येथील अपार्टमेट मध्ये फिर्यादी हीने दिलेल्या फिर्यादीवरुन फिर्यादी हिला आरोपी याने जॉब जाण्याची भीती घालून फिर्यादीशी जबरदस्तीने शारीरिक संबध ठेवून फिर्यादी हिला धमकी दिली म्हणुन फिर्यादी हिने आरोपी याचेविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली होती. म्हणून फिर्यादी हीने दिलेल्या फिर्यादीवरुन कुडाळ पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आलेला आहे. कुडाळ पोलीस ठाणे गुन्हा रजी. नं. १३४/ २०२५ च्या गुन्ह्यामधून आरोपी याची जामीनावर मुक्तता करण्यात यावी म्हणून ओरोस येथील मे. सत्र न्यायाधीश यांचे कोर्टात अर्ज केला होता आरोपी यांच्या वतीने अॅड. अमोल सुरेश सामंत, अॅड. हितेश हेमंत कुडाळकर यांनी काम पहिले. सदर कामी आरोपी याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेवून मे. कोर्टाने आरोपी याची ५०,०००/- (पन्नास हजार रुपयाचा) जामिनावर आणि अटी व शर्तीवर मुक्तता करण्यात आली आहे.












