श्रीभवानी आईच्या प्रांगणात नवीन कुर्ली ग्रामपंचायतच्या “नवदुर्गा युवा मंडळ” कडून फोंडाघाटचे ज्येष्ठ पत्रकार कुमार नाडकर्णी- उभयतांचा, श्रीफळ,शाल,पुष्प देऊन, सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज ललिता पंचमीच्या शुभदिनी श्रीमाऊलीच्या सानिध्यात करण्यात आलेला सत्कार,हा माझ्या प्रामाणिक कामाचा श्रीदेवीकडून मिळालेला आशीर्वाद समजतो. याबद्दल मी मंडळाचा ऋणी आहे, असे मत कुमार नाडकर्णी यांनी यावेळी व्यक्त करून,सर्वांना धन्यवाद दिले—











