वेंगुर्ले : प्रतिनिधी : नविन शैक्षणिक वर्षासाठी उभादांडा नं.१ शाळेतील मुलांना जिजाऊ शैक्षणिक व सामिजिक सेवाभावी संस्था व युवा संदेश प्रतिष्ठान यांच्या मार्फत मोफत वह्या वाटप करण्यात आले. इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व मुलांना रू.15000 च्या वह्यांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परूळेकर, अण्णा रेडकर, दिव्या नवार, अपूर्वा चेंदवणकर व इतर मान्यवर तसेच पालक उपस्थित होते.
शालेतील मुलांना मोफत वह्या पुरवून शैक्षणिक योगदान दिल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समिती, पालक, मुख्याध्यापक व.शिक्षक वृंदाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे व युवा संदेश प्रतिष्ठानचे आभार मानले आहेत.