रत्नागिरी : प्रतिनिधी l राज्य शासनाच्या महिला व बालविकास कक्ष आणि नवनिर्माण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप नुकताच झाला. या प्रशिक्षणाचा लाभ शेकडो युवतीनी घेतला.
नवनिर्माण संस्थेच्या बृहत भारतीय समाज सभागृहात मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. महिला स्व संरक्षण प्रशिक्षक स्वप्नाली पवार, राहुल चव्हाण, स्वानंद खेडेकर, साहिल मुसाडकर,तुषार मयेकर, प्रांजल मयेकर, आदित्य साळुंखे, अमृत गोरे, प्राजक्ता पेटावे यांनी दिवसभर मुलींना हे प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणात स्वतःला कसे संरक्षण द्यावे, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अगदी साध्यासाध्या व्यायामाने शरीर आणि मन कसे मजबूत करता येईल, याबाबत प्रत्यक्षिकाद्वारे शिकविण्यात आले. आपल्या हातात असलेल्या कोणत्याही वस्तूपासून आपले आपण संरक्षण करु शकतो किवा आपल्या
हातात कोणतीही वस्तू नसताना आपलं संरक्षण कसे करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.