कुणकवण वाघ ग्रुप मुंबई ने घर जळालेल्या घाडी कुटुंबाला केली आर्थिक मदत

कुणकवण वाघ ग्रुप मुंबई ने घर जळालेल्या घाडी कुटुंबाला केली आर्थिक मदत
* चाकरमानी एकवटले, व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जमा केले ४६ हजार ७०३ रुपये
*बाबा घाडी यांच्याकडे सुपूर्द केले रक्कम
देवगड;
देवगड तालुक्यातील कुणकवण गावातील बंदरवाडी मधील लक्ष्मण येसू उर्फ बाबा घाडी यांच्या राहत्या घराला आग लागून मोठे नुकसान झाले होते.या घाडी कुटुंबाला कुणकवण वाघ ग्रुप मुंबई व गावातील ग्रामस्थ यांच्या वतीने सहकार्य करण्यात आले.४६ हजार ७०३ रुपयाची आर्थिक मदत या कुटुंबाला करण्यात आली.
उपसरपंच श्री मंगेश गुरव,पोलीस पाटील छोटू रावराणे,ग्रामपंचायत सदस्य श्री आनंद ठाकूरदेसाई तसेच बंदरवाडी मधील ग्रामस्थ यांनी आपल्या परीने अथक प्रयत्न करून बिकट परिस्थितीत या घाडी कुटुंबाला हाताभार लावला होता.ही घटना मुंबई येथील कुणकवण वाघ ग्रुप ला कळल्यानंतर या ग्रुप चे ऍडमीन सचिन शांताराम रावराणे यांना माहिती सर्वांना दिली आणि कुणकवण वाघ ग्रुप च्या माध्यमातून मुंबई मधील चाकरमान्यांना आर्थिक मदतीसाठी आवाहन केले. गावाच्याच
एकजुटीने,सकारात्मक विचारधारणेने ४६,७०३ रूपये असा भक्कम मदतनिधी जमा झाला हा निधी श्री लक्ष्मण येसू घाडी उर्फ बाबा घाडी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.