केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून खानोलीत विद्युतीकरणासाठी ५ लाखाचा निधी मंजूर

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ

वेंगुर्ले : प्रतिनिधी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खासदार निधीतून खानोली ग्रामपंचायत परीसरात विद्युतीकरणासाठी ५ लाखाचा निधी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जि.प.मतदार संघातील खानोली गावच्या सरपंचा सौ.प्रणाली खानोलकर व उपसरपंच सुभाष खानोलकर , सामाजिक कार्यकर्ते व माजी सरपंच महेश प्रभुखानोलकर व संजु प्रभु यांच्या पाठपुराव्यामुळे खानोली गावाला विद्युतीकरणासाठी नारायण राणे यांनी खासदार निधी मंजूर केला .त्यामुळे दुर्गम असलेल्या भागात विद्युतीकरण होणार असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

कामाच्या शुभारंभ प्रसंगी खानोली गावात आलेले भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत सरपंच प्रणाली खानोलकर यांनी केले. तसेच प्रदेश सदस्य शरद चव्हाण यांचे स्वागत उपसरपंच सुभाष खानोलकर यांनी केल. यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , जिल्हा कार्यकारिणी सदस्य साईप्रसाद नाईक – बाळा सावंत – वसंत तांडेल , ता.सरचिटनिस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , दादा केळुसकर , ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस , ता.चिटणीस समीर कुडाळकर व नितीन चव्हाण , विजय नाईक , सुनील घाग , वसंत परब , शक्ती केंद्र प्रमुख सुधीर गावडे व शामसुंदर मुननकर , रविंद्र शिरसाठ , सुर्यकांत परब , आनंद परब , तात्या केळजी , ओंकार चव्हाण , सुनील सावंत , बाबा राऊत , शिरगांवकर , प्रथमेश सावंत , पांडुरंग सावंत , विलास सावंत , संदिप खानोलकर , सागर सावंत , प्रकाश सावंत , शुभम सावंत , बाळु सावंत , विनायक प्रभु , केशव राऊळ , सुभाष राऊळ तसेच इतर अनेक ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते .