मसुरे | झुंजार पेडणेकर : महाराष्ट्र पॉवर लिफ्टींग असोसिएशन व सचिवालय – जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने मधुकर दरेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त पुरुष व महिला पॉवर लिफ्टींग स्पर्धा मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. यास्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हयातील पोयरे (मशवी) देवगड येथील रामचंद्र श्रीकांत केसरकर हा ‘कोकण सिंधु पॉवर लिफ्टींग फेडरेशन’ तर्फे सहभागी झाला होता. त्याने ६६ किलो वजनी गट (सिनिअर) यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. यापुढील होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी तो पात्र झाला आहे. रामचंद्र केसरकर यांचा पॉवर लिफ्टिंग राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवल्याबद्दल मशवी येथे उद्योजक भालचंद्र माटवकर यांनी त्याचे अभिनंदन करत सत्कार केला.यावेळी प्रमोद माटवकर, संदीप मुणगेकर, गणेश परब, मनीष केसरकर, विशाल धुरी आदी उपस्थित होते. रामचंद्र केसरकर याच्या यशा बद्दल कौतुक होत आहे.