मुंबई विद्यापीठ कोंकण विभाग टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्ण पदक
रत्नागिरी – मुंबई विद्यापीठ अंतर्गत कोंकण विभाग क्रमांक ४ आयोजित टेबल टेनिस स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला संघाने सलग दुसऱ्या वर्षी सुवर्ण पदक पटकावत सांघिक विजेतेपद मिळवले.
११ ते १३ सप्टेंबर २०२५ दरम्यान सावर्डे (ता. चिपळूण) येथील आर्टस अँड सायन्स महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या महिला संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले. तर पुरुष संघाने चौथा क्रमांक पटकावला.
महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे व सहाय्यक क्रीडा शिक्षक प्रा. कल्पेश बोटके यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने ही कामगिरी केली. सुवर्णपदक विजेत्या महिला व पुरुष खेळाडूंना र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन, कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे, जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, तीनही शाखांचे उपप्राचार्य, जिमखाना कमिटीचे उपाध्यक्ष डॉ. विवेक भिडे तसेच सर्व प्राध्यापक, कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.












