शिरोडा खर्डेवाडी शाळेत ३० सप्टेंबर रोजी पारितोषित वितरण व मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम..

वेंगुर्ले l प्रतिनिधी :जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा खर्डेवाडी, शिरोडा या शाळेत मंगळवार ३० सप्टेंबर २०२५ रोजी सरस्वती पुजन कार्यक्रमा निमित्त पारितोषित वितरण कार्यक्रम व मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तरी आपली सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन मुख्याध्यापक श्रीम.अश्विनी सोरेकर यांनी केले आहे.

मंगळवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वा शारदा पूजन, आरती व तीर्थप्रसाद, सकाळी ११.०० वा कुंकूमार्चन, सायं. ३.०० वा. माजी आमदार शंकर कांबळी यांच्या अध्यक्षतेखाली परितोषिक वितरण व विविध गुणदर्शन कार्यक्रम तसेच इतर मनोरंजनात्मक दांडीया, फुगडी, भजन कार्यक्रम होणार आहेत. तर बुधवार १ ऑक्टोबर २०२५ सायं. ४.०० वा. शारदा विसर्जन होणार आहे.