मसुरे | झुंजार पेडणेकर : स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र विलेपार्ले मुंबईची सन 2025 ते 27 साठीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून अध्यक्षपदी डॉ. अरविंद रमेश प्रभू यांची फेर निवड झाली आहे. पदसिद्ध सदस्य म्हणून आम. ऍडव्होकेट पराग अळवणी, माजी नगरसेवक अभिजीत सावंत यांची निवड झाली आहे. सदस्य म्हणून संजय सावंत, अविनाश हडकर, राजीव पांडे, सुभाष पेठे , अनिल जानी, केशव परांजपे,विनायक जोशी,उद्योजक डॉ श्रीकृष्ण उर्फ दीपक परब, वसंत अमीन, नंदकुमार आंबेकर, दीपिका तांबे, वर्षा अंधारे, सुरेखा जाधव, वर्षा करंबेळकर, मेधा शेटे, संगीता गावडे, सुपर्णा तांबे, विनीता हाटे यांची निवड झाली आहे. सर्व विभाग समित्यांच्या सहकार्याने संस्थेच्या वतीने स्वातंत्रवीर सावरकर जयंती, लोकमान्य टिळक जयंती व पुण्यतिथी, स्वातंत्रदिन, गोपाळकाला, महात्मा गांधी जयंती व लाल बहाद्दूर शास्त्री जयंती, दसरा, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्रवीर सावरकर आत्मार्पण दिवस, गुढीपाडवा आदी कार्यक्रम आयोजित केले जातात. सर्वांच्या सहकार्याने संस्थेच्या वतीने अधिक कृतिशील कार्यक्रम राबविले जातील असे यावेळी डॉ. अरविंद प्रभू म्हणाले.











