“उन्मेष” आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव
आबलोली :
भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीने साहित्य अकादमीमार्फत यावर्षी “उन्मेष : आंतरराष्ट्रीय साहित्य महोत्सव”चे तिसरे पर्व पाटणा (बिहार) येथे २५ ते २८ सप्टेंबर २०२५ या कालावधीत भव्यदिव्य स्वरूपात करण्यात आले आहे. या महोत्सवाचे आयोजन बिहार सरकारच्या सहकार्याने करण्यात आले आहे.यात देश-विदेशातील सुमारे ६०० हून अधिक लेखक, कवी, समीक्षक, अनुवादक व साहित्यिक या महोत्सवात सहभागी झाले .स्पेन, रशिया, बल्गेरीया, नेपाळ, बांग्लादेश, हाॅलंड , कझाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, फ्रान्स, यासारख्या देशातील साहित्यिकांबरोबर देशातील जावेद अख्तर, ज्ञानपीठकार दामोदर मावजो,अमोल पालेकरांसारख्या अभिनेते दिग्गज लेखकांबरोबर निवडक मोजके मराठी लेखकही सहभागी होते.
हा महोत्सव सम्राट अशोक कन्व्हेन्शन सेंटर, गांधी मैदान रोड, मुरादपूर, पाटणा येथे संपन्न होत आहे.
काव्यमहोत्सव या महोत्सवाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कवितेच्या विशेष सत्रांतर्गत २६ सप्टेंबर २०२५ रोजी बहुभाषिक काव्यवाचनात महाराष्ट्रातील प्रख्यात कवी,गीतकार, कादंबरीकार ,समीक्षक, संपादक,अनुवादक, डॉ. बाळासाहेब लबडे यांना दुपारच्या सत्रात सहभागी होण्यासाठी साहित्य अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवासराव यांच्या आमंत्रणावरून उपस्थित होते.
“दलित कविता द अनकेजझ्ड केव्हज” या सत्रात डॉ. लबडे आपल्या “मुंबई...बंबई.. बॉम्बे..” कवितासंग्रहातील तीन कवितांचे हिंदी अनुवादित रूप सादर केले. या कवितांनी रसिकांची वाहवा मिळवली.
या महोत्सवात मराठी भाषेचे प्रतिनिधित्व डॉ. बाळासाहेब लबडे यांनी केले.त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. त्यांची आत्तापर्यंत अठरा पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यांना 40 राष्ट्रीय व राज्य पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विविध अभ्यासक्रमामध्ये त्यांचे साहित्य आहे. त्यांनी चित्रपटासाठी गाणी लिहिलेली आहेत. ते पीएचडीचे मार्गदर्शक आहेत. त्यांचे साहित्य इंग्रजी, गुजराती, कन्नड, हिंदी, या भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष पद मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक शरण कुमार लिंबाळे यांनी भूषवले. तर इतर भाषिक कवींमध्ये कन्नड, तेलगू ,राजस्थानी, बांग्ला, मल्याळम,पंजाबी कवींचा समावेश होता.












