जानवळे नं 2 शाळा इमारतीला धोका;पालक वर्ग संतप्त

गुहागर | प्रतिनिधी
तालुक्यातील जानवळे नं. २ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दर्शनी भागात मातीचा उंच भाग असल्याने पावसाळ्यात सदरील माती पावसामुळे घळत असून जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. शाळेच्या मागील संरक्षक भिंत (बांध) कोसळला आहे. ही भिंत साधी होती. त्यामुळे शाळेच्या इमारतीच्या पायाला धोका संभवू शकतो. विद्यार्थी खेळत असताना पाय घसरून खाली पडू शकतात. या ठिकाणी बांध कोसळल्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो किंवा तेथे असलेले झाड शाळेवर पडू शकते, असे संबंधित विभागाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. वारंवार येथील ग्रामस्थ, शाळेचे मुख्याध्यापक व ग्रामपंचायत यांनी २०१३ पासून पंचायत समिती, शिक्षण विभाग व गटशिक्षण अधिकारी यांना वारंवार लेखी स्वरुपात पत्र देऊनही दुर्लक्ष होत आहे.