राजापूरातुन शनिवारी चोरीला गेलेली ती बुलेट मलकापूर कोकरूड मार्गावर बेवारस स्थितीत आढळली

पोलीसांकडून तपास सुरू

राजापूर | प्रतिनिधी : शहरानजीकच्या कोदवली साईनगर परिसरातील रहाते घरासमोर लावलेली व चोरीला गेलेली रॉयल इनफिल्ड क्लासिक ३५० (बुलेट) ही महागडी मोटारसायकल मलकापूर कोकरूड मार्गावर रस्त्याच्या साईटला गटारात बेवारस स्थितीत आढळून आली आहे. चोरटयांनी ही गाडी या ठिकाणी टाकून पळ काढल्याचा पोलीसांचा कयास आहे.
अशा प्रकारे मलकापूर कोकरूड मार्गावर रस्त्याच्या साईटला गटारात बेवारस स्थितीत बुलेट गाडी असल्याची माहिती तेथील स्थानिकांनी गाडी मालकांना दिल्यानंतर गाडी मालकांनी याबाबत राजापूर पोलीसांत माहिती दिली. पोलीसांकडून तात्काळ ही गाडी ताब्यात घेण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

शहरानजीकच्या कोदवली साईनगर परिसरातील रहाते घरासमोर लावलेली बुलेट चोरी झाल्याची घटना शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान घडली होती. यात तीन चोरटे चोरी करताहना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. या प्रकरणी शमसुद्दीन अब्दुल्ला काझी (वय ६१), सध्या रा. साईनगर, कोदवली यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हिरव्या रंगाची, एमएच ०८ बीएफ ३८८८ क्रमांकाची बुलेट मोटारसायकल राहत्या घराच्या बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये लावली होती ती चोरीला गेली होती.

पोलिसांनी या प्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दरम्यान सोमवारी सकाळी अशा प्रकारे काझी यांची चोरीला गेलेली ही बुलेट मलकापूर कोकरूड मार्गावर रस्त्याच्या साईटला गटारात बेवारस स्थितीत असल्याची माहिती त्या भागातील स्थानिकांनी काझी यांना दिली होती. गाडीच्या क्रमांकावरून तपास करून त्यांनी मालकांना कळविले होते. मालकांनी याबाबत राजापूर पोलीसांत माहिती दिली. पोलीसांकडून तात्काळ ही गाडी ताब्यात घेण्यासाठी एक पथक रवाना झाले आहे. तशी माहिती पोलीसांनी दिली आहे.

अशा प्रकारे ही गाडी मलकापूर कोकरूड मार्गावर रस्त्याच्या साईटला गटारात बेवारस स्थितीत आढळून आल्याने चोरटे हे बाहेरील असल्याचे पुढे आले आहे.

या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज वरून पोलीस तपास करत असून रत्नागिरी स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागासह कोल्हापूर व अन्य भागातील पोलीसांनाही याबाबत कळविण्यात आले असूत तपास सुरू आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे करत आहेत.