बेरड समाजाला मिळणार हक्काचे व्यासपीठ : दिनेश गावडे
आंबोली । प्रतिनिधी : चौकुळ येथील
चिखलवाळ-बेरडकी येथे आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नातून व माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या नवीन समाज मंदिराचा भूमिपूजन सोहळा नुकताच अत्यंत उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण सोहळ्याप्रसंगी शिवसेना सावंतवाडी तालुका प्रमुख दिनेश शिवाजी गावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बेरड समाजातील बांधवांनी या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.
या कार्यक्रमास नंदू गावडे, भाऊ जाधव, बुधाजी नाईक, मोहन नाईक, नितीन गावडे (जॉन), सोमा (सोमनाथ) गावडे, अजित गावडे, युवराज नाईक यांच्यासह बेरड समाजातील इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्माण होणाऱ्या या समाज मंदिराच्या माध्यमातून समाजातील नागरिकांना विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या कल्याणाकारी उपक्रमामुळे स्थानिक स्तरावर समाजातील एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ होण्यास मोठी मदत होणार असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजूट साधत ही एक नवी सामाजिक प्रगतीची सुरुवात ठरणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी दिनेश गावडे यांनी दिली.












