यामध्ये गुजरातमधील नौकांचा समावेश
देवगड : प्रतिनिधी
वादळसदृश वातावरणाचा फटका मच्छिमारी व्यवसायाला बसला असून हवामान विभागाने समुद्रात ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असून अतिवृष्टीची शक्यता ओहे यामुळे मच्छिमारीसाठी जावू नये असा इशारा दिल्यानंतर स्थानिक नौकांबरोबरच गुजरात, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला मधील शेकडो नौका देवगड बंदरात आश्रयासाठी दाखल झाल्या आहेत.
किनारपट्टी भागात २८ सप्टेंबरपासुन वादळी वाèयासह मुसळधार पावसाने सुरूवात केली असून समुद्रात वादळसदृश वातावरणही निर्माण झाले आहे.तीन नंबरचा बावटा लावण्यात आला असून ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये अशा सुचना हवामान विभागाने मच्छिमारांना दिल्या आहेत या पाश्र्वभुमीवर रविवारी सायंकाळपासूनच मच्छिमारीसाठी गेलेल्या नौकांनी सुरक्षित असलेल्या देवगड बंदराचा आश्रय घेतला आहे यामध्ये गुजरातमधील १०५ तसेच रत्नागिरी ३ व स्थानिक नौकांबरोबच मालवण, वेंगुर्ला येथील सुमारे दीडशेहून अधिक नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.३० सप्टेंबरपर्यंत वादळसदृश वातावरण व अतिवृष्टीचा इशारा दिला आहे यामुळे मच्छिमारी व्यवसाय ठप्प झाला आहे.













