शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व पदाधिकारी यांनी केले अभिनंदन
मालवण | प्रतिनिधी : शासकीय तंत्रनिकेतन मालवण जनरल सेक्रेटरी (GS) पदी प्रणय सुहास बागवे विजयी झाले. तर कल्चरल सेक्रेटरी (CS) पदी कौस्तुभ नितीन सामंत यांची बिनविरोध निवड झाली. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी प्रणय व कौस्तुभ यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसेना राजा गावडे तालूका प्रमुख, विभाग प्रमुख मंदार लुडबे विभाग प्रमुख, शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, दादा नाईक, सूरज बिरमोळे, किरण अहिर यांसह हर्ष धामापूरकर , मोहन गावडे, शशांक नाबर, प्रताप लोंढे, पार्थ सापळे, अनिश देऊलकर, अंकुश राऊळ, निखिल पिकूळकर, आदित्य राऊळ, आदित्य चव्हाण, प्रथमेश पवार, आर्यन राणे यांसह अन्य उपस्थित होते.












