त्या खचलेल्या तळवली-परचुरी रस्त्याची तात्पुरती डागडुजी

गुहागर प्रतिनिधी
मुसळधार पावसाने तालुक्यातील तळवली परचुरी मार्गावरील खचलेल्या आगरवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची अखेर काल मंगळवारी तात्पुरत्या स्वरूपात डागडुजी करण्यात आली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने या खचलेल्या रस्त्याची दखल घेत ही डागडुजी केली आहे.

दरम्यान शनिवारी हा रस्ता खचत असल्याचे निदर्शनात आले.यामुळे येथून अवघड वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती.मुख्य म्हणजे पर्यायी मार्ग नसल्याने परचुरी एस.टी. बस सेवा देखील ठप्प झाली आहे. पांगारी व परचुरीकडे जाणारी एस.टी. बस सेवा पूर्णपणे ठप्प झाल्याने येथील विद्यार्थी व प्रवासीवर्ग यांची मोठी गैरसोय होत आहे.तळवली परचुरी मार्गावरील श्री सोमनागेश्वर मंदिरापुढे हा रस्ता खचला आहे.मुख्य म्हणजे ज्याठिकाणी हा रस्ता खचला आहे तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला भातशेती असल्याने मोठ्या वाहनांना येथून जाण्यासाठी कोणताच पर्याय नाही. केवळ छोटी वाहने येथुन ये करत आहे. अखेर सोमवारी सदर खचलेल्या रस्त्याची पाहणी करून सार्वजनिक बांधकाम विभागाने मंगळवारी तात्पुरत्या स्वरूपात या रस्त्याची डागडुजी केली आहे. आजूबाजूला भातशेती असल्याने सध्या स्तिथीत संरक्षक भिंत बांधणे शक्य नसल्याने ही तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे.गुहागर सार्वजनिक बांधकाम विभागाचे टेक्निकल असिस्टंट अजय पवार यांनी स्वतः देखभाल करून ही तात्पुरती डागडुजी करून घेतली असून ठेकेदार दीपक शिरधनकर यांचे यासाठी सहकार्य लाभले.तसेच परचुरी ग्रामस्थांनी देखील यासाठी चांगले सहकार्य केले. दरम्यान या डागडुजीनंतर दोन दिवसांनी येथून अवघड वाहतूक सुरू केली जाईल असे सांगण्यात येत आहे.