तिन्ही ग्रामपंचायतींनी दिला होता जप्तीचा इशारा
गुहागर प्रतिनिधी:
अंजनवेल, वेलदूर व रानवी या तीन ग्रामपंचायतींचा गेले कित्येक वर्ष आरजीपीपीएल कंपनीकडून थकलेला कर अखेर जप्तीच्या इशाऱ्यानंतर 50 टक्के प्रमाणात तीनही ग्रामपंचायतींना वर्ग करण्यात आला आहे. याबाबतची माहिती पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर व उपसभापती निलेश सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तीनही ग्रामपंचायतींनी काही दिवसांपूर्वी कंपनीने कर न दिल्यास कंपनीवर जप्तीची कारवाई करण्याचा इशारा दिला होता.यानंतर कंपनीने सन 2021 ते 2026 या कालावधीत रखडलेला तिन्ही ग्रामपंचायतींचा कर अखेर प्रत्येक ग्रामपंचायतीला 50 टक्के प्रमाणात ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा केला आहे.यामध्ये अंजनवेल ग्रामपंचायतीला 4 कोटी 75 लाख 54 हजार 158, रानवी ग्रामपंचायतीला 1 कोटी 24 लाख 37 हजार 42, वेलदूर ग्रामपंचायतीला 1 कोटी 1 लाख 29 हजार 527 इतका कर सदर ग्रामपंचायतींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.याबाबतची अधिकृत माहिती सभापती प्रणव पोळेकर यांनी गुहागर पंचायत समिती येथे पत्रकार परिषदेत दिली. तीनही ग्रामपंचायतींच्या सरपंच रण रागिणीचे उपसभापती निलेश सुर्वे यांनी यावेळी विशेष कौतुक केले.तसेच माजी सरपंच यशवंत बाईत यांनी देखील महत्वाची भूमिका बजावली असल्याचे सभापती प्रणव पोळेकर यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
या पत्रकार परिषदेला पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, सदस्य मंगेश जोशी, गौरव वेल्हाळ,सारिका दाभोळकर, अंजनवेल सरपंच वेलदूर सरपंच दिव्या वणकर, रानवी सरपंच सौ.मोरे,रानवी सरपंच तसेच अंजनवेलचे माजी सरपंच यशवंत बाईत उपस्थित होते.












