जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धेत वीर राऊळ, कौस्तुभ धुरी प्रथम

आरोस माऊली मंदिरात आयोजन

बांदा : प्रतिनिधी 

 

आरोस येथे श्री देवी माऊली मंदिरात आयोजित जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धेत लहान गटात वीर राऊळ व खुल्या गटातून कौस्तुभ धुरी यांनी प्रथम क्रमांक मिळविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

 

आरोस माऊली मंदिरात नवरात्रोत्सव काळात घाटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत अकरा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. अभंग गायन स्पर्धा, निसर्गप्रेमी रानमाणूस प्रसाद गावडे यांचे कोकणातील देवराई व राखणदार याविषयावरील अभ्यासपूर्ण मार्गदर्शन, फुगडी, दशावतार नाटक, भजने व धार्मिक विधी आदी कार्यक्रमांचे अयोजन करण्यात आले होते.

 

लहान गटात प्रथम वीर राऊळ (न्हावेली), द्वितीय सर्वज्ञ वराडकर (बांदा), तृतीय केतन बिर्जे, उत्तेजनार्थ कनक काळोजी यांनी यश मिळवले. तर खुल्या गटात प्रथम कौस्तुभ धुरी (सातोसे), द्वितीय सुरज पार्सेकर (न्हावेली), तृतीय अन्वी धारगळकर (आरोस), उत्तेजनार्थ पारितोषिक हेमंत गोडकर यांनी मिळविले. सर्व विजेत्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

सदर स्पर्धा निखिल नाईक, संदेश देऊलकर, महेश कुबल, गणपत नाईक, सुहास कोरगावकर, विनायक नाईक, रोशन नाईक, भाई देऊलकर, दत्तगुरू दळवी, बाबा मेस्त्री, सिद्धेश कुबल, नारायण चव्हाण, रितेश नाईक, किरण कळंगुटकर यांनी पुरस्कृत केली होती. यासाठी आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष निलेश परब यांचेही सहकार्य मिळाले. स्पर्धेत एकूण ३० स्पर्धक सहभागी झाले होते. स्पर्धेचे परीक्षण गोवा येथील दशरथ नाईक यांनी केले. कार्यक्रमाचे निवेदन होडावडा, वेंगुर्ला येथील काका सावंत यांनी केले. स्पर्धकांना हार्मोनियम साहिल घुबे (धाकोरे), तबला अक्षय कांबळी (साटेली) व तबला साथसंगत प्रथमेश परब (आरोस) यांनी केली. बाबू गोडकर व उत्तम परब यांचे विशेष सहकार्य लाभले.