सरस्वती पूजन आणि दांडियाचे आरवली हायस्कूल येथे आयोजन

गौरव पोंक्षे | माखजन
संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथील श्री देव केदार विद्यामंदिर आरवली हायस्कूलमध्ये सरस्वती पूजन आणि त्या निमित्ताने दांडिया नृत्याचे  आयोजन करण्यात आले होते सरस्वती मातेच्या पूजनाने उत्सवाचा प्रारंभ झाला. शाळेचे मुख्याध्यापक श्री. अमोल सरनोबत यांनी सरस्वती मातेला पुष्पहार अर्पण केला. विद्येची देवता शारदेची विधिवत पूजा करून विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी झेंडूची फुले वाहून नमस्कार केला..
सरस्वती पूजनाच्या निमित्ताने शाळेमध्ये दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले. सरस्वती पूजन आणि दांडियामुळे शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. स्वरूपा कनगुटकर यांनी केले. पारंपारिक दांडिया नृत्यांमध्ये आधुनिक गाणी आणि संगीताच्या तालावर  विद्यार्थिनीने आधुनिक रंगीबेरंगी पोशाख आणि दागिन्यांनी सुशोभित होऊन दांडियाच्या विशिष्ट तालावर नृत्य केले.विद्यार्थ्यांसमवेत शिक्षिका सौ.स्वरूपा कनगुटकर यांनी देखील सहभाग घेतला. आयोजित या सोहळ्यामुळे शाळेत उत्सवाचे वातावरण अधिक आनंददायी झाले.