रत्नागिरी: दुर्गादेवींच्या मूर्ती विसर्जनामुळे रत्नागिरी शहरातील वाहतुकीत २ आणि ३ ऑक्टोबर रोजी बदल करण्यात आला आहे. दुपारी ३ ते रात्री १२ वाजेपर्यंत भुतेनाका-भंडगतिठा ते मांडवी या मार्गावरील वाहतूक बंद राहील.
पर्यायी मार्ग: भुते नाका-मिरकरवाडा तिठा-मत्स्यालय-नाईक फॅक्टरी मार्गे वाहतूक सुरू राहील.
२ आणि ३ ऑक्टोबर रोजी मांडवी समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात दुर्गादेवी मूर्तींचे विसर्जन होणार आहे.
या विसर्जनासाठी अंदाजे पाच ते सहा हजार भाविक एकत्र येण्याची शक्यता आहे.
यामुळे वाहतुकीची कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
ही अधिसूचना पोलीस वाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, आणि शासकीय वाहनांना लागू होणार नाही.
याबाबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी वाहतूक नियंत्रण अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. देवी मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या वाहनांनाच आत प्रवेश दिला जाईल, तर इतर वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.












