मालवण | प्रतिनिधी : आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनात युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांनी मालवण तालुक्यातील युवासेना पदाधिकारी यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
मालवण कुडाळ युवासेना सहसचिव पदी अक्षय तावडे, जिप विभाग मसुरे, आचरा, आडवली-मालडी युवासेना तालुका सचिव पदी चिन्मय तांडेल, युवासेना मसुरे विभागप्रमुखपदी धनंजय परब, आचरा विभागप्रमुख पदी उमेश सावंत, आडवली-मालडी विभागप्रमुख पदी गितेश खेडेकर यांसह जिप विभाग देवबाग, पेंडूर, पोईप युवासेना तालुका संघटक पदी अमोल मुळीक, उप तालुका प्रमुख पदी संदेश वेतुरेकर, तालुका सचिव पदी तथागत मालवणकर तर जिप सुकळवाड पोईप विभाग प्रमुख पदी विशाल धुरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे तसेच युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली व आमच्या विनंतीनुसार ही नियुक्ती करण्यात येत आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण आत्मसात करून शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास आहे. आपल्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! जय हिंद। जय महाराष्ट्र !! असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या हस्ते नवनियुक्ती पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावडे, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक बाईत, शिवसेना सरपंच संघटना तालुकाप्रमुख शाम वाक्कर, सांस्कृतिक विभाग जिल्हाप्रमुख भालचंद्र केळूसकर, युवासेना विधानसभा प्रमुख प्रितम गावडे, युवासेना उपजिल्हा प्रमुख मिहीर राणे, युवासेना तालुकाप्रमुख स्वप्नील गावडे, युवासेना तालुकाप्रमुख अभि लाड, संकेत राऊळ यांसह शिवसेना, युवासेना पदाधिकारी यांची मोठी उपस्थिती होती. यात माजी जिप सभापती संतोष साटविलकर, माजी उपसभापती छोटू ठाकुर, मसुरे उपसरपंच पिंट्या गांवकर, मकरंद राणे, मंदार लुडबे, बबन परब, संदीप भोजणे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.











