संघ संचलनात सहभाग, स्वयंसेवकांशी संवाद
“संघाचे शताब्दी वर्ष हा अढळ निर्धाराचा संकल्प” – ना. राणे
देवगड : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील मिठबांव शाखेला भेट देऊन स्वयंसेवकांसमवेत विजयादशमी उत्सव साजरा केला.
या वेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी स्वयंसेवकांशी संवाद साधला तसेच शिस्तबद्ध संचलनात सहभाग दर्शवला.
गेल्या १०० वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनुशासन, राष्ट्रभक्ती, सेवा आणि चारित्र्यनिर्मितीचा जो दीप प्रज्वलित केला आहे, तो आज संपूर्ण देशाला दिशा दाखवतो, असे ते म्हणाले.
“संघाचे हे शताब्दी वर्ष केवळ उत्सव नाही, तर भविष्यातील भारताचा अढळ निर्धार आहे. संघाचे विचार, राष्ट्रासाठी जगण्याची प्रेरणा आणि हिंदुत्वाचा अभिमान हीच खरी भारताची ताकद आहे,” असेही त्यांनी नमूद केले.










