गौरव पोंक्षे | माखजन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा,संगमेश्वर तालुक्याचा विजयादशमी चा उत्सव ५ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे.खेरशेत येथील भागीर्थीबाई राजेशिर्के सभागृहात,विसावा मंगल कार्यालय येथे होणार आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या निर्मिती चे शताब्दी वर्ष सुरु होत आहे.या पार्श्वभूमीवर विजयादशमीच्या कार्यक्रमाने शानदार सुरवात होत आहे.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत होणार आहे.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोकरे येथील ह.भ.प.रमेश महाराज घडशी व प्रमुख वक्ते म्हणून धर्म जागरण समन्वयक,कोकण प्रांत परियोजना प्रमुख, विवेक विठ्ठल गानू असणार आहेत.
अखंड भारत भूमीच्या चरणी नतमस्तक असणाऱ्या हिंदू बांधवांचे संघटन व्हावे,मायभूमीचे संरक्षण करण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र यावे यासाठी १९२५ साली डॉ हेडगेवारांनी सहकार्यांना सोबत घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.याला १०० वर्षे होत असल्याने शताब्दी महोत्सव साजरा होत आहे.
खेरशेत येथे होणाऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन संगमेश्वर तालुका कार्यवाह ओंकार नामजोशी यांनी केले आहे.











