राष्ट्रीय स्वयंसेवक संघा तर्फे दसरा निमित्त वेंगुर्ले शहरातून झालेले संचलन

वेंगुर्ले : प्रतिनिधी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वेंगुर्ला तर्फे आज शनिवारी सायंकाळी दसरा निमित्त वेंगुर्ले शहरातून संचलन करण्यात आले.
वेंगुर्ले येथील स्वामिनी मंगल कार्यालय येथून ही संचलन फेरी निघाली. ती दाभोली नाका, गाडीआडा, चार गदा मारुती, लकी स्टोअर, शिरोडा नाका, जुना स्टॅन्ड वरून पुन्हा स्वामिनी मंगल कार्यालया पर्यंत जाऊन थांबले. या संचलनामध्ये मोठ्या संख्येने संघ स्वयंसेवक आणि नागरिक सहभागी झाले होते.

दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, वेंगुर्ले आयोजित दसरा निमित्त संचलन मार्गावर संचलनात सहभागी संघ स्वयंसेवकांवर दाभोली नाका, डुबळे गल्ली, मार्केट, गाडीअड्डा, चार गदा मारुती मंदिर, पुर्वस मंदिर ( लकी स्टोअर्स ), शिरोडा नाका, कलानगर, जुना एस् टी स्टॅन्ड, गिरपवाडा येथे नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे पुष्पवृष्टी करण्यात आली.