मालवण आयटीआय मध्ये अल्पमुदतीच्या रोजगारक्षम अभ्यासक्रमाना प्रवेश घेण्याचे आवाहन

मसुरे | झुंजार पेडणेकर राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था व तांत्रिक विद्यालय केंद्रांमध्ये पायाभूत सुविधांचा महत्तम उपयोग करून संस्थेच्या वेळेव्यतिरिक्त वेळेत अल्पमुदत अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.
राज्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व शासकीय तांत्रिक विद्यालयामध्ये अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहेत. या उपक्रमामधून अधिकाधिक विद्यार्थ्यांन। प्रशिक्षणाची संधी मिळावी, रोजगारक्षमतेत वाढ व्हावी व कौशल्य विकासाला चालना मिळावी हा शासनाचा उद्देश आहे.

मा. प्रधानमंत्री, श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. ८ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी 3 वाजता अल्पमुदत अभ्यासक्रम सुरू करण्याचा ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रम संपन्न होणार आहे. मालवण आयटीआय येथे पाच कोर्सेस सुरु होणार आहेत. 8 तारीख ला दुपारी तीन वाजता ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. आयटीआय बाहेरील विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात प्रवेश घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. उद्घाटन कार्यक्रमाला देखील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शासकीय औधोगिक प्रशिक्षण संस्था मालवणचे प्राचार्य श्री. सचिन संखे यांनी केले आहे.