लांजा आणि राजापूर पोलिसांचा चोख समन्वय
राजापूर । नरेंद्र मोहिते : मुंबई गोवा महामार्गावर लांजा येथे एका छोट्या मुलाला धडक देऊन फरार झालेल्या राजस्थान मधील फॉरचुनर गाडी चालकाला राजापूर पोलिसांनी एसटी डेपो समोर नाकाबंदी करून ताब्यात घेतले आहे. मुंबई गोवा महामार्गावर लांजा येथे लांजातील एका छोट्या मुलाला धडक देऊन तेथे न थांबता भरधाव वेगाने ही गाडी राजापूरच्या दिशेने रवाना झाली.
राजापूर च्या दिशेने रवाना झाली. याबाबत लांजा येथून सागर बेर्डे यांनी राजापूरचे एड. महेश नकाशे व प्रसाद गुरव यांना तात्काळ दूरध्वनी करून माहिती दिली. नकाशे व गुरव यांनी याबाबत लगेचच राजापूर पोलिसांना कळवले . राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी ती डेपो समोर सापळा रचून लांजातून फरार झालेल्या या कारचालकाला व गाडीतील त्याच्या सहकाऱ्यांना अवघ्या वीस मिनिटात राजापूर एसटी डेपो समोर ताब्यात घेतले. यानंतर या कारचालकासह त्याचे सहकारी यांना लांजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. राजापूर पोलिसांच्या कार्यकर्ते बद्दल कौतुक होत आहे. याप्रकरणी लांजा पोलीस तपास करत असल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली











