आडवली नं. १शाळेस दोन स्मार्ट टी .व्ही .भेट

जि .प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. १या शाळेस माजी विद्यार्थी तथा उद्योजक श्री. महेश मधुकर मोहिते यांच्याकडून सॅमसंग कंपनीचा ३२इंची आणि श्री. मधुकर रामचंद्र साटम यांच्याकडून ३२इंची एल .जी .कंपनीचा असे दोन स्मार्ट टी. व्ही. भेट देण्यात आले. त्यांनी दिलेल्या या दोन टी. व्ही. संचामुळे विद्यार्थ्याना आधुनिक डिजिटल आणि व्हर्चुअल शैक्षणिक साहित्यासह शिक्षण घेणे सोपे होणार आहे.
या पूर्वी आडवली मालडी ग्रामविकास मंच यांच्या वतीने विद्यार्थी सुरक्षेच्या अनुषंगाने शाळेमध्ये चार सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

त्यांच्या या दातृत्वा बद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. जगदीश घाडीगांवकर स्कूल कमिटी अध्यक्ष श्री. विष्णू घाडीगांवकर यांनी आभार मानले आहेत.त्यांनी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांना शाळेमध्ये भौतिक सुविधा निर्माण करण्यासाठी आर्थिक सहयोगाचे आवाहन केले आहे. आडवली नं १शाळेच्या विकासामध्ये माजी विद्यार्थ्यांचे नेहमीच सहकार्य लाभते या बद्दल शाळेतील शिक्षक श्री. रामचंद्र कुबल ,श्रीम. तनुजा तांबे ,श्रीम. रागिणी ठाकूर ,श्रीम. वेदिका वाघाटे यांनी समाधान व्यक्त केले .तसेच श्रावण केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. देवू जंगले यांनी शाळेच्या होत असलेल्या शैक्षणिक आणि भौतिक प्रगतिबद्द्ल समाधान व्यक्त केले .