दोडामार्ग : प्रतिनिधी
विजघर ते तिलारी राज्यमार्गाच्या रुंदीकरणाच्या कामावरून सुरू असलेल्या वादाला आता हिंसक वळण लागले आहे. रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण व धमकी दिल्याच्या आरोपावरून ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी आणि युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे यांच्यासह सहा जणांविरुद्ध दोडामार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
१८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास दोडामार्ग ते विजघर राज्यमार्गावरील मुळस–खराडी ब्रिज परिसरात घडली. ज्ञानेश्वर अनंता गुजर (वय ३८, मूळ रा. सातारा; सध्या रा. साटेली भेडशी) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
गुजर हे त्यांच्या कंपनीमार्फत सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामावर देखरेख करत असताना, संशयितांनी तिथे येऊन कामात अडथळा निर्माण केला. यावेळी संशयितांनी फिर्यादीचा मोबाईल फोडून नुकसान केले, त्यांना हाताने मारहाण करत शिवीगाळ केली आणि गाड्या फोडून आग लावण्याची धमकी दिली, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,श्री बाबुराव धुरी (जिल्हाप्रमुख, ठाकरे शिवसेना)
मदन राणे (युवासेना तालुकाप्रमुख)
संदेश राणे,संतोष मोर्ये,विजय जाधव
मिलिंद नाईक,या सर्वांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३२४(२), ३५२, आणि ३५१(२)(३) नुसार बेकायदेशीर जमाव जमवणे, मारहाण, नुकसान आणि धमकी देणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आशिष भगत करत आहेत.
तालुक्यात ठीक ठिकाणी विकास कामे सुरु असून काम बंद पाडून धमाकावणे व चिरीमिरी करून कामे सुरु केली जातात हे प्रकार गाव पातळीवरून तालुक्यात घडत आहे त्यामुळे विकास कामे होताना अडचणी येत असल्याने निधी वाया जात आहे हेच कारण सांगून ठेकेदार पळ काढतात स्थानिक कामे घेत नाही तर बाहेरच्या ठेकेदार कामे घेतात व कामे बंद दादागिरी अधिकारी वर्ग ही कंटाळले आहे असे सर्रास असे प्रकार घडत आहे त्यामुळे विकास कामे होत नाही ठेकेदार हे कारण सांगून कामे करताना विलंब करतात त्यातून स्थानिक जनतेला त्रास होताना दिसत आहे
यांचे तीव्र पडसाद रस्त्याच्या कामात सुरू असलेल्या कथित अनागोंदी कारभाराबाबत राजकीय पदाधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होतात यामुळे दोडामार्ग तालुक्यात अशा प्रकारबाबत संतापाची लाट उसळली आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.










